Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून 17 नोव्हेंबरला येणार तुफान? फडणवीस, जरांगे आणि शरद पवार कोल्हापुरात

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा हा लढा सुरू आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या या आंदोलनावरून विरोधक आणि सत्ताधारी अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत.

अशात मनोज जरांगे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार ( Sharad Pawar) एकाच दिवशी कोल्हापुरात दाखल होणार आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार 17 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापूर शहरामध्ये उपस्थित राहणार आहे.

त्यामुळे येत्या 17 नोव्हेंबरकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्रातील तीन दिग्गज कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ यांच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तर दुसरीकडे याच दिवशी मनोज जरांगे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहे. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी दर्शन घेऊन मनोज जरांगे जिल्ह्यात (Maratha Reservation) भव्य सभा घेणार आहे.

राज्यातील हे तिघ दिग्गज एकाच दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

Manoj Jarange will visit Maharashtra over Maratha reservation

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये उपोषणाला सुरुवात केली.

त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण स्थगित करत राज्य सरकारला या मुद्द्यावर (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभर दौरे करणार आहे. 15 नोव्हेंबर पासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. तर 17 नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe