Share

Ajit Pawar | दुपारी शरद पवार तर संध्याकाळी अमित शाहांची भेट; अजित पवारांच्या मनात नक्की काय?

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? याचा अंदाज बांधणे आता अवघडच नाही तर अशक्य झालं आहे.

अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर काल शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाली आहे.

पुण्यात काल दुपारी यांची ही भेट झाली. तर त्यानंतर काल संध्याकाळी अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील या भेटीदरम्यान उपस्थित होते.

Ajit Pawar, Sharad Pawar and Supriya Sule were together

काल दुपारी पुण्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले होते. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे.

शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

त्यानंतर काल संध्याकाळी अजित पवारांनी (Ajit Pawar) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या सर्व घडामोडीनंतर अजित पवारांच्या मनात नक्की काय सुरू आहे? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासह आलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय होईल? याचा अंदाज बांधणे कठीण नाही तर अशक्य झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics