Share

Ravi Rana | “अनिल परबांनी अनेक वर्षे ‘मनपा’ची दलाली केली”; रवी राणांचा गंभीर आरोप 

🕒 1 min read Ravi Rana | अमरावती : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला आहे. म्हाडा कार्यालयामध्ये मोठ्या गर्दीसह गेल्यानंतर आमदार अनिल परब यांची कार रोखण्यात आली. यानंतर त्यांच्यासोबत आलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. या सगळ्यांशी संवाद साधून अनिल परब त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ravi Rana | अमरावती : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला आहे. म्हाडा कार्यालयामध्ये मोठ्या गर्दीसह गेल्यानंतर आमदार अनिल परब यांची कार रोखण्यात आली. यानंतर त्यांच्यासोबत आलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. या सगळ्यांशी संवाद साधून अनिल परब त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी बोलायला गेले. या संदर्भात बोलताना आमदार रवी राणा यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले, “आंदोलन करणारे चेहरे माझ्या घरावर आंदोलन करण्यासाठी अनिल परब यांनी पाठविले होते. किरीट सोमय्यांना भेटायला गेलो असताना त्यांच्यावर हल्ला करणारे हेच आंदोलनकारी होते. तो हल्लासुद्धा अनिल परब यांच्या लोकांनीच केला होता. अशा प्रकारची कट-कारस्थानं उद्धव ठाकरे यांना हाताशी घेऊन अनिल परब करत असतात.”

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महापालिकेच्या संबंधित महापौरांनी त्यासाठी पैसे खाल्लेअसल्याचं सांगत अनिल परब यांनी महापालिकेची अनेक वर्षे दलाली केली, असा गंभीर आरोपही रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे.

मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम अनिल परब यांनी केल्याचा दावा रवी राणा यांनी केला. “अनिल परब यांना आव्हान देतो. आज तुमची सत्ता नाही. माझं घर मोजायला या. काय इल्लिगल आहे. ते माझ्यासमोर तोडा”, अशा शब्दात रवी राणा यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या