Rose Water & Honey | गुलाब जल आणि मध चेहऱ्याला लावल्याने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rose Water & Honey | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याशी संबंधित समस्या (Skin Problem) वाढत चालल्या आहे. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादने चेहऱ्याला हानी पोहचवू शकतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही मध आणि गुलाब जलचा वापर करू शकतात. त्यामध्ये आढळणारे पोषक घटक त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला मध आणि गुलाब जलचा फेसपॅक बनवून घ्यावा लागेल. दोन चमचा मधामध्ये तुम्हाला एक चमचा गुलाब जल मिसळून फेसपॅक तयार करून घ्यावा लागेल. हा फेस पॅक तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्याने पुढील फायदे मिळू शकतात.

पिंपल्सची समस्या दूर होते

मध आणि गुलाब जलचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन निघून जाऊन चेहरा स्वच्छ होतो. मध आणि गुलाब जलमध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिईफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही या फेस पॅकचा वापर करू शकतात.

त्वचा हायड्रेट राहते

गुलाब जल आणि मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हा फेसपॅक वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते. नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या मुलायम आणि चमकदार होऊ शकते.

त्वचेचा रंग सुधारतो

गुलाब जल आणि मधाचा फेस पॅक वापरल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात. परिणामी त्वचेचा टोन सुधारतो. त्यामुळे नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचेची काळेपणाची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या