Gopichand Padalkar | “मुलीने उपवास केल्यावर चांगला मुलगा मिळतो पण मुलांना…”; गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

Gopichand Padalkar | पुणे : पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अहिल्या शिक्षण मंडळाच्या हॉलमध्ये गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भाषणावेळी तुफान फटकेबाजी केली.

“मुलीने जर सोमवारचा उपवास केला, तर तिला चांगला मुलगा मिळू शकतो. पण, पोरांनो तुम्हाला उपवास करून चांगली मुलगी मिळणार नाही. तुम्हाला एमपीएससीत सिलेक्ट व्हावे लागेल”, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हंटल. यांच्या या विधानानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी गोपीचंद पडळकर यांना उचलून घेत त्यांच्या नावाचा जयजयकार केला. सरकारच्या या निर्णयावर पडळकर म्हणले, “आज विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या भावना सरकारने ऐकल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आनंदात आहेत. मात्र या निर्णयामुळे ज्यांना पोटशूळ उठला आहे, त्यांना रडत बसूद्या. त्याला पर्याय नाही.”

महत्वाच्या बातम्या :