Anil Parab | “म्हाडाने मला लेखी दिलं आहे की…”; अनिल परब यांचा मोठा  गौप्यस्फोट

Anil Parab | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. वांद्रे येथील म्हाडा वसाहतीमधील कार्यालय पाडण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हाडाकडून अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

या घटनेनंतर अनिल परब आज स्वत: म्हाडाच्या कार्यालयात गेले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परबांची बराच वेळ बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “मागच्या दीड वर्षापासून किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते की अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे. मी वारंवार सांगितलं की जागा माझी नाही तर सोसायटीची आहे. कार्यालय मला वापरण्यासाठी सोसायटीने दिलं होतं. हे कार्यालय माझं आहे हा जो आरोप किरीट सोमय्या करत होता तो आरोप सपशेल खोटा आहे.”

“म्हाडाने मला लेखी दिलं आहे की या जागेशी माझा कुठलाही संबंध नाही. परिच्छेद क्रमांक एक मध्ये लिहिलं आहे की गांधीनगर वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ या दोन इमारतींच्या मधे करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत म्हाडा कार्यालयातील नस्तीचं अवलोकन करता सदर अनधिकृत बांधकामाशी माननीय आमदार अनिल परब यांचा काही संबंध नाही. याचा अर्थ असा आहे की किरीट सोमय्या खोटे बोलत आहेत. किरीट सोमय्या आज तोंडावर पडले आहेत”, अशी टीका अनिल परब यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.