Ajit Pawar | “कोण बागेश्वर बाबा? संत तुकाराम महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही; अजित पवार आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हास्यजत्रा फेम ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

“राज्यात महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा अशी मागणी करणार आहे” असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

“बागेश्वर बाबा कोण आहे? त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी”, अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

“आपण लोकशाहीत काम करतो. आपल्या खंडप्राय देशात लोकशाहीला मोठे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान, घटना दिली आहे. ही घटना व संविधानाच्या चौकटीमध्ये बसणार्‍या ज्या बाबी असतील त्या माध्यमांनी दाखवल्या पाहिजेत, वृत्तपत्रात छापल्या पाहिजेत, लेख पण लिहिले पाहिजेत. ज्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, ज्यातून धर्मा-धर्मात तेढ निर्माण होणार आहे, जातीयद्वेष निर्माण होणार आहे,”, असे बीबीसीच्या माहितीपटाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.