Anil Parab | “किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार”; अनिल परब आक्रमक

Anil Parab | मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हाडाकडून अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण या घटनेनंतर अनिल परब आज स्वत: म्हाडाच्या कार्यालयात गेले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परबांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. किरीट सोमय्या करत होते तो आरोप सपशेल खोटा … Read more

Published On: 

Anil Parab | मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हाडाकडून अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण या घटनेनंतर अनिल परब आज स्वत: म्हाडाच्या कार्यालयात गेले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परबांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.

किरीट सोमय्या करत होते तो आरोप सपशेल खोटा आहे असं माजी मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. एवढंच नाही तर किरीट सोमय्या खोटं बोलत आहेत याचा पुरावाच मला म्हाडाने दिला आहे, असंही अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “मुळ प्लॅनच्या बाहेर जे बांधकाम केलं जातं त्याला अनधिकृत बांधकाम म्हटलं जातं. त्यामुळे मी म्हाडाकडे मुळ बांधकामाच्या नकाशाची कॉपी मागितली आहे. परंतु, ही कॉपीच म्हाडाकडे नाही. त्यामळे हे अनधिकृत बांधकाम कसं हा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर म्हाडाने यावर तपास करून उत्तर देऊ असं म्हटलं आहे.”

“आठ दिवसात ही कॉपी देऊ असं देखील म्हाडाने सांगितलं आहे. म्हाडाने जर आठ दिवसात मुळ नकाशाची कॉपी दिली नाही तर मी त्यांच्यावर हक्कभंग दाखल करेन, कोर्टात जाईन”, असा इशारा अनिल परब यांनी दिलाय.

किरीट सोमय्या यांना या सर्व गोष्टींचा जाब विचारणार आहे. त्यांना नाक घासायला लावणार आहे असंही ते म्हणालेत. शिवाय गरीबांची घरं पाडण्याच्या सोमय्या यांच्या षडयंत्राला भाजपचा पाठिंबा आहे का? असा सवालही यावेळी अनिल परब यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही