Share

Jayant Patil | “सत्तारूढ पक्षात…”;बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याला जयंत पाटालांचं सडेतोड उत्तर

🕒 1 min read Jayant Patil | मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता … Read more

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे.

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशी दोन्हीकडे आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. अलीकडे मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, जनतेची गैरसोय होत आहे. राज्यात लवकरच राजकीय स्थिरता यावी, अशी आमची इच्छा आहे,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जयंत पाटलांचं उत्तर

“विरोधीपक्षात कोणतीही अस्थिरता नाही आहे. सत्तारूढ पक्षात अस्थिरता असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. तसेच, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा करणार आहे. दोन-तीन दिवसांत याबद्दल निर्णय घेऊ,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

“धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे,” असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या