Anil Parab | म्हाडाकडे नकाशा नसतानाही अनधिकृत बांधकामाची नोटीस; अनिल परबांनी दिला इशारा

Anil Parab | मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचं म्हाडाच्या वांद्रे येथील वस्तीत असणारं कार्यालय आज पाडण्यात आले आहे. त्याववरुन राजकारण तापलं आहे. संबंधित कार्यालय हे अनधिकृतपणे बांधण्यात आलं होतं. त्यामुळे म्हाडाने त्यावर हातोडा मारत कारवाई केली, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र, या सगळ्या घडामोडी नंतर अनिल परब आज म्हाडा कार्यालयात दाखल झाले. त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अनिल परब तब्बल चार तास म्हाडा कार्यालयात होते. त्यानंतर ते कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा केली.

“म्हाडाकडे ज्या इमारतीत आपलं कार्यालय होतं त्या इमारतीचा मूळ नकाशाच नाही. तरीदेखील ते कार्यालय अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून आपल्याला नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे म्हाडाने तो नकाशा सादर करावा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जांव”, असा इशाराच अनिल परब यांनी देवून टाकला आहे.

“त्यांनी आम्हाला सांगितलंय की, आम्ही सगळं तपासून पाहतो. असेल तर सादर करतो. मूळ बांधकामाचे नकाशे मिळाले नाहीत तर मी म्हाडावर हक्कभंग दाखल करेन. कोर्टात जाईन अशाप्रकारच्या नोटीस केवळ त्रास देण्यासाठी दिल्या जात असल्याचं सांगेन”, असं अनिल परब म्हणाले. “तिसरा मुद्दा माझा असा आहे की, साठ दिवसांत रेगुलरायझेनचा अर्ज मंजूर केला नाही तर त्याला डिम्प मंजूर समजला जातो. मी जे अगोदर म्हाडाला पत्र दिलं होतं त्या पत्राच्या आधारावर मी त्यांना सांगितलं होतं की त्याचे ६० दिवस झाले आहेत. म्हणून हा अर्ज डिम्प मंजूर आहे, असं समजतो.”, असे अनिल परब यांनी सांगितले आहे..

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.