Share

#Union_Budget_2023 | सोनं-चांदी महागलं की स्वस्त झालं?; सोन्याबाबत अर्थमंत्र्यांनीची काय घोषणा?

🕒 1 min read #Union_Budget_2023 | नवी दिल्ली : सर्वसामान्य व्यक्ती बचत करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याकडे प्राधान्याने पाहतात. आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने-चांदी महागाईबाबत अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. … Read more

Published On: 

🕒 1 min read

#Union_Budget_2023 | नवी दिल्ली : सर्वसामान्य व्यक्ती बचत करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याकडे प्राधान्याने पाहतात. आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोने-चांदी महागाईबाबत अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमधील कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे.

केंद्र सरकारने टॅक्सची जुनी व्यवस्था आता बंद केली आहे. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, कोणकोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणकोणत्या वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. सोने, चांदी आणि प्लॅटिनम आता महागणार आहे. तसेच सिगारेट देखील महागणार आहे. कारण सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढून आता 16 टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांना सिगारेसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. देशी किचन चिमणी देखील महागणार आहे.

मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स स्वस्त होतील एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित उपकरणं स्वस्त होतील. अलिकडेच टीव्हीच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

India Finance Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या