Share

Job Opportunity | भारत सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत सरकार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागात भरती प्रक्रिया राबवत असते. भारत सरकारचा राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारत सरकार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 118 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांमध्ये निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी http://www.nia.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यानंतर या अर्जाची प्रिंट काढून इच्छुक उमेदवारांना तो एसपी (अ‍ॅडमीन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003 या पत्त्यावर पाठवावा लागेल. दिनांक 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील, अशा बेताने इच्छुक उमेदवारांना अर्ज पाठवावे लागतील.

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत सरकार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागात भरती प्रक्रिया राबवत असते. …

पुढे वाचा

Job Education

Join WhatsApp

Join Now