Share

Lemon-Honey | केसांना मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी लिंबू-मधाचा ‘या’ प्रकारे करा वापर

🕒 1 min read Lemon-Honey | टीम महाराष्ट्र देशा: केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र या केमिकलयुक्त उत्पादनामुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ही उत्पादन न वापरता तुम्ही मध आणि लिंबाचा वापर करू शकतात. मध आणि … Read more

Published On: 

🕒 1 min read

Lemon-Honey | टीम महाराष्ट्र देशा: केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र या केमिकलयुक्त उत्पादनामुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ही उत्पादन न वापरता तुम्ही मध आणि लिंबाचा वापर करू शकतात. मध आणि लिंबाचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी मध आणि लिंबाचा पुढील प्रमाणे वापर करा.

मध आणि लिंबू (Lemon and Honey)

केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचे मिश्रण केसांना लावू शकतात. यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टी समान प्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते वीस मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागेल. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात. या मिश्रणाचा वापर केल्याने केस मजबूत राहू शकतात.

लिंबू-मध आणि कोरफड (Lemon-Honey and Alovera)

कोरफड केसांना मॉइश्चराईज करण्याचे काम करते. कोरफडीमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिंबू-मध आणि कोरफडीचे मिश्रण केसांना लावू शकतात. यासाठी तुम्हाला तिन्ही गोष्टी समान प्रमाणात एकत्र मिसळून घ्याव्या  लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्धा तास हे मिश्रण डोक्यावर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस शाम्पूने धुवावे लागतील. आठवड्यातून तीन ते चार वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात.

लिंबू-मध आणि दही (Lemon-Honey and Curd)

केसांना माऊ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही दही, मध आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दही, मध आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला किमान अर्धा तास डोक्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या वापराने केसांमधील कोरडेपणाची समस्या दूर होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या