Ajit Pawar | अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला; म्हणाले, “मला वाटतं त्यानं…”

Ajit Pawar | पुणे : गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला.

कॉंग्रेसने सुधीर तांबे यांच्यासह सत्यजीत तांबे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागेलेलं आहे. यावर 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे ( Satyajit Tambe ) यांनी दिली. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे.

Ajit Pawar Advice to Satyajit Tambe

इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करणार पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा, असा सल्ला अजित पवार ( Ajit Pawar Advice to Satyajit Tambe ) यांनी दिला.

सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे हे कॉंग्रेसच्या विचारांचे आहे, त्यामुळे सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) हे थोरामोठ्याचे ऐकतील असं वाटतं असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी मोठा खुलासा केला आहे. सत्यजीतला उमेदवारी दया असं स्वत: पवार साहेबांनी मल्लिकार्जून खरगेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली, असे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :