Ajit Pawar | “सत्यजीतसाठी शरद पवारांनी मल्लिकार्जून खरगे यांना फोन केला, पण…”; अजित पवारांचा गौप्यस्फोट 

Ajit Pawar | पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला.

कॉंग्रेसने सुधीर तांबे यांच्यासह सत्यजीत तांबे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागेलेलं आहे. सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने सत्यजित तांबे यांना तिकिट द्यायला हवं होतं. सत्यजित तांबेंना तिकिट द्या, हे सांगण्यासाठी शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनाही फोन केला होता. मात्र डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आणि तिथंच गडबड झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे हे कॉंग्रेसच्या विचारांचे आहे, त्यामुळे सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) हे थोरामोठ्याचे ऐकतील असं वाटतं असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. वरिष्ठांशी सत्यजीतचे चांगलं संबंध आहेत. त्यामुळे काँग्रेसने आणि सत्यजीतने फार ताणून धरू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी सत्यजित तांबे ( Ajit Pawar Advice to Satyajit Tambe ) यांना दिला.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.