Viral Infaction | व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Viral Infaction | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वातावरणात सातत्याने बदल होत आहे. या वातावरणात तुम्ही सहज आजारी पडू शकतात. या हवामानामध्ये सर्दी, ताप, खोकला इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला पोषक आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास, तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर या गोष्टींचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी तुम्ही आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

तूप

व्हायरल इन्फेक्शन (Viral Infaction) पासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात तुपाचा समावेश केला पाहिजे. भाजीपाला आणि डाळीत मिसळून तुम्ही तुपाचे सेवन करू शकतात. तुपाच्या सेवनाने शरीरात ऊर्जा वाढते. त्याचबरोबर तुपाच्या सेवनाने कोरड्या त्वचेची समस्या देखील दूर होऊ शकते. नियमित तुपाचे सेवन केल्याने आरोग्यासोबत त्वचाही निरोगी राहते.

बाजरीची भाकरी

बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. त्यामुळे मोसमी आजारांपासून (Viral Infaction) दूर राहण्यासाठी तुम्ही बाजरीच्या भाकरीचे सेवन करू शकतात. यामध्ये विटामिन बी सुद्धा भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे नियमित याच्या सेवनाने आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

आवळा

आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास तुम्ही मोसमी आजारांपासून (Viral Infaction) दूर राहू शकतात. तुम्ही आवळ्याची चटणी, मुरब्बा, रस इत्यादी गोष्टींचे सेवन करू शकतात. आवळ्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि मिनरल्स आढळून येतात. हे गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

गुळ

मोसमी आजारांपासून (Viral Infaction) दूर राहण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकतात. गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आढळून येते. त्यामुळे गुळाच्या नियमित सेवनाने तुम्ही व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहू शकतात. गुळाचे सेवन केल्याने शरीर प्रदूषणाच्या प्रदुर्भावापासून दूर राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button