Devendra Fadanvis | “ही झोपेत बोलणारी लोक आहेत”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadanvis | मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने वांद्रे येथील बीकेसी मैदानावर भाजप आणि शिंदे गटाने त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत.

अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला डिवचले. पंतप्रधान मोदी उद्या शिवसेनेने केलेल्या कामांवरच शिक्कामोर्तब करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्या या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “ही झोपेत बोलणारी लोकं आहेत”, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणालेत.

“मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं. टक्केवारी ठरली नाही म्हणून त्यांनी रस्त्याचे टेंडर काढले नाही. टक्केवारी ठरत नव्हती म्हणून टेंडर निघत नव्हते. आम्ही मात्र, वर्क ऑर्डर दिले. यांना क्लेम करण्याचा अधिकारच नाही. यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी 15 वर्ष रस्तेच झाले नसते”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना लगावला.

संजय राऊतांचं वक्तव्य काय? 

पंतप्रधान ज्या कामांचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत, त्यातील बरीचशी कामे शिवसेनेने सुरू केली होती. शिवसेनेने केलेल्या कामाच्या पायभरणीचं लोकापर्ण होणार आहे. याचा अर्थ आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :