Aloevera Side Effects | चेहऱ्यावर कोरफड लावल्याने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aloevera Side Effects | टीम महाराष्ट्र देशा: कोरफड आपल्या केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कोरफडीच्या नियमित वापराने आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे होतात. कारण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यामध्ये विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे याच्या वापराने त्वचेची संबंधित अनेक समस्या सहज दूर होतात. पण तुम्हाला माहित आहे का? कोरफडीच्या वापराने त्वचेवर काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. होय! कोरफडीचा योग्य पद्धतीने वापर न केल्याने चेहऱ्याला हानी पोहोचू शकते. कोरफडीमुळे चेहऱ्याला पुढील नुकसान होऊ शकते.

चेहऱ्यावर मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते

अनेकदा कोरफडीच्या पानांमधून पिवळ्या रंगाचे द्रावण बाहेर पडते. हे द्रावण चेहऱ्यासाठी खूप घातक ठरू शकते. चेहऱ्यावर कोरफड लावताना हे द्रावण चेहऱ्यावर लावल्या गेल्यास चेहऱ्याला हानी पोहचू शकते. या द्रावणामुळे चेहऱ्यावर मुरुमाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आधीपासूनच मुरूम किंवा पुरळ असल्यास कोरफडीचा जास्त वापर करणे टाळावा.

एलर्जी आणि पुरळ

कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावल्याने अनेकांना ऍलर्जीचा त्रास होण्याची संभाव्यता असते. त्वचा अधिक कोरडी असल्यास त्वचेवर कोरफडीमुळे पुरळ देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल, तर तुम्ही चेहऱ्यावर कोरफड लावण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी आणि कोरडेपणाची समस्या दूर करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते. मात्र कोरफडीच्या अतिरिक्त वापराने त्वचा जास्त प्रमाणात कोरडी व्हायला लागते. परिणामी त्वचेवर पिंपल्स वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आधीपासूनच पिंपल्स असतील, तर तुम्ही कोरफडीचा कमी प्रमाणात उपयोग केला पाहिजे.

टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या