Chandrashekhar Bawankule | “2047 पर्यंत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ नाहीच”; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chandrashekhar Bawankule | नागपूर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये तांबे पिता-पुत्रांनी ऐनवेळी निर्णय बदलल्याने काँग्रेस तोंडावर आपटली तर नागपुरात तीन उमेदवारांपैकी महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून संभ्रम कायम आहे. या पार्शवभूमीवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसबाबत मोठं वक्तव्य केला आहे.

“काँग्रेसची स्थिती अधिकच वाईट होत असून 2047 पर्यंत काँग्रेसला (Congress) अच्छे दिन येणार नाहीत. नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विशेष म्हणजे काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. काँग्रेसचं डुबतं जहाज असून एक दिल के टुकडे हुए हजार अशीच अवस्था आहे”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“काँग्रेसमध्ये बुथ लेव्हलपर्यंत कोणी काम करायला तयार नाही. नेतृत्व नाही म्हणून कार्यकर्ते अस्वस्थ आहे. 2047 पर्यंत काँग्रेस पक्षाला काही चांगले दिवस नाही. हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजले आहे. त्यामुळे 30-30 वर्ष आता काँग्रेसमध्ये राहून आपले आयुष्य खर्ची घालायचे नाहीये. तिथे गेल्यावर आजही तिच परिस्थिती आहे. नेत्याचा मुलगा आमदार खासदाराचा खासदार ही काँग्रेसची परिस्थिती आहे. अजूनही नेते आपल्या मुलांना प्रमोट करायला कामाला लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते अस्तित्वात नाही”, अशीही टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :