Sharad Pawar | सातारा : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलेलं आहे. एकीकडे शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे. तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (union minister of state for home ajay kumar mishra) यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांचा अजित पवारांवर (Ajit Pawar) विश्वास नसल्याचं अजयकुमार मिश्रा यांनी म्हंटल आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात ते बैठका घेत आहेत. साताऱ्यातील कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भाजप दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यांच्या या आरोपावार पलटवार करताना अजयकुमार मिश्रा म्हणाले, “शरद पवार (Sharad Pawar) यांचा अजित पवारांवर (Ajit Pawar) विश्वास नाही. धमकीमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दुसऱ्याला देणार होते.” दरम्यान, अजयकुमार मिश्रा यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार काय उत्तर देतात का?, हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Tips | वसंत ऋतुमध्ये फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Ashok Chavan | “माणसं फोडायची आणि…”; सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
- Aloevera Side Effects | चेहऱ्यावर कोरफड लावल्याने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम
- Eknath Shinde | “जगभरात मोदींची छाप”; दावोसहून परतल्यावर मुख्यमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- Chandrashekhar Bawankule | “2047 पर्यंत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ नाहीच”; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा