Travel Tips | वसंत ऋतुमध्ये फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: वसंत ऋतू फिरायला जाण्यासाठी सर्वात अनुकूल ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये सर्वत्र कोकिळेचे मधुर स्वर ऐकायला येतात. त्याचबरोबर या वातावरणात झाडांना नवीन पालवी फुटायला सुरू होते. त्यामुळे लोक फिरायला जाण्यासाठी वसंत ऋतूची निवड करतात. या ऋतुमध्ये प्रवास करणे योग्य मानले जाते. तुम्ही पण जर या ऋतूमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही सुंदर ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

मुघल गार्डन, दिल्ली

देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात स्थित असलेले मुघल गार्डन आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब पाहायला मिळतात. ही बाग दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात एक महिन्यासाठी पर्यटकांसाठी खुली केली जाते. मुगल गार्डन उघडायची फुले प्रेमी आतुरतेने वाट बघत असतात. लवकरच ही बाग उघडणार असून तुम्ही या ठिकाणी भेट देण्याचा प्लॅन बनवू शकतात.

लवासा, पुणे

लवासा हे ठिकाण प्री-वेडिंग शूटसाठी प्रमुख केंद्र बनले आहे. लवासा हे सुंदर शहर पुण्याच्या जवळ स्थित आहे. वसंत ऋतुमध्ये या जागेचे सौंदर्य अधिकच वाढते. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर लवासा सिटी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

गोकर्ण, कर्नाटक

कर्नाटक राज्यामध्ये स्थित असलेले गोकर्ण हे एक धार्मिक स्थळ आहे. गोकर्णला महाबळेश्वर मंदिर आहे. गोकर्णमध्ये असलेला समुद्रकिनारा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी तुम्ही सायकलिंग आणि ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकतात. या ऋतूमध्ये गोकर्णचे वातावरण फिरण्यासाठी अतिशय अनुकूल असते.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.