Pune Bypoll Election | पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर! 

Pune Bypoll Election | पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक आयोगाने आज अचानकपणे पोटनिवडणूक जाहीर केली. या दोन जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येईल.

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाला तीन आठवडे तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला केवळ १५ दिवस झाले आहेत.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यापैकी एकाला मिळणार की गणेश बीडकर यांचाही विचार होणार होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या तिघांच्या नावाशिवाय दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या घरातील कुणाचा विचार होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही. त्या जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडते. महाराष्ट्रातल्या या प्रघातानुसार या दोन जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडतेय का हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.