Uddhav Thackeray | “नरेंद्र मोदी यांची देशातून हवा संपत चालली”; मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा टोला

Uddhav Thackeray | औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या मुंबई दौऱ्यानिमित्ताने ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही जहरी टीका केली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली असल्याचं म्हंटल आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या सभेत पाच मुख्यमंत्री आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. त्यामुळे 2024 ला नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा ठरवून काढलेला दौरा आहे. आगामी काळात मुंबई महानगरपालिकच्या निवडणुका असल्या कारणाने मतदार भुलवण्यासाठीच नरेंद्र मोदी मुंबईत आले असल्याची टीकाही चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :