Bhaskar Jadhav | “… तेव्हा मोदींनी मुंबईची विशेष काळजी घेतली नव्हती अन् आता निवडणुका…”- भास्कर जाधव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bhaskar Jadhav | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज मुंबईत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी देखील भाजपवर टीका केली आहे.

“मुंबईमध्ये मोदीसाहेब येत आहेत म्हणजे आपण समजलं पाहिजे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ घातली आहे. ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत असतात, त्या त्या ठिकाणी भाजपकडून नरेंद्रम मोदी येत असतात. कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात होती मात्र त्यावेळी नरेंद्र मोदी मुंबईत आले नाहीत”, असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला आहे.

“भारतीय जनता पक्ष हा वाचाळवीरांचा पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जी विकास कामे करण्यात आली होती, त्याच विकास कामांचे उद्घाटन नरेंद्र मोदी करणार. विकास कामांवरून ज्या प्रमाणे टीका करण्यात आली आहे त्याच प्रमाणे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायचे हे नरेंद्र मोदी यांची खासियत आहे”, असेही भास्कर जाधव म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या