Share

Nitin Desai | नितीन देसाई यांनी का केली आत्महत्या? जाणून घ्या सविस्तर

Nitin Desai | टीम महाराष्ट्र देशा: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि कर्जत एनडी स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. एनडी स्टुडिओमध्येच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. चौकशी दरम्यान देसाई यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं आहे. Nitin Desai … Read more

Published On: 

Nitin Desai | टीम महाराष्ट्र देशा: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि कर्जत एनडी स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे.

एनडी स्टुडिओमध्येच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. चौकशी दरम्यान देसाई यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं आहे.

Nitin Desai committed suicide due to a debt of 249 crores

नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या डोक्यावर 249 कोटी रुपयांचं कर्ज झाल्यामूळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती टाइम्स नाऊ मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

या कर्जासाठी 2016 आणि 2018 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करार झाले होते. त्यानंतर या कर्जासाठी देसाई यांनी त्यांची काही मालमत्ता तारण म्हणून ठेवली होती.

मात्र, तरीही कर्जाची संपूर्ण वसुली होत नव्हती. 03 मे 2022 पर्यंत या कर्जाची रक्कम व्याजासह 249 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली असल्याची माहिती देखील टाइम्स नाऊ मराठीने दिली आहे.

दरम्यान, नितीन देसाई (Nitin Desai) यांनी हिंदीचं नाही, तर अनेक मराठी चित्रपटांचे देखील कला दिग्दर्शन केले होते. 1942 मध्ये ‘अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.

‘किक’, ‘जोधा अकबर’, ‘बालगंधर्व’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘प्रेम रतन धन पायो’ इत्यादी चित्रपटांसाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केले होते. त्याचबरोबर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांसाठी सेट उभे केले होते.

कर्जतमध्ये नितीन देसाई (Nitin Desai) यांचा एनडी स्टुडिओ होता. हा स्टुडिओ त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध होता. या स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर राज्यामध्ये सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही