Mahavikas Aghadi | महाविकास आघाडी लागली कामाला! सत्ताधाऱ्यांविरोधी लढ्याची ‘ब्लू प्रिंट’ करणार तयार

Mahavikas Aghadi | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी उभारली आहे.

इंडियाची पुढची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना राज्यात भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने देखील तयारी सुरू केली आहे.

A meeting of Mahavikas Aghadi will be held

लवकरच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपविरोधी लढ्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना मणिपूर मुद्द्यावरून चांगलंच धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर याचे पडसाद संसदेमध्ये देखील दिसून आले आहे.

अशात लवकरच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या या बैठकीमुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या दोन यशस्वी बैठका पार पडल्या आहे. यामध्ये पहिली बैठक बिहारच्या पाटणा शहरामध्ये झाली होती. तर दुसरी बैठक कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये पार पडली.

त्यानंतर विरोधकांच्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी विरोधकांची मुंबईतील बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) संयुक्त आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, जितेंद्र आव्हाड इत्यादी उपस्थित राहतील.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.