Share

Devendra Fadnavis | “तेव्हा आम्ही तिघं वेगळे होतो, मात्र आज…”; फडणवीसांचं ‘ते’ विधान चर्चेत

Devendra Fadnavis | पुणे: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.

मेट्रो उद्घाटन कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आहे. पुण्याच्या स्वप्नांना गती देण्यासाठी मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आलो असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “आजपासून पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन झालं त्याचबरोबर अनावरही झालं.

त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन देखील झालं. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) आणि मी एकत्र होतो.

मात्र, तेव्हा आम्ही तिघही वेगवेगळी जबाबदारी पार पाडत होतो. तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते.

तर त्यावेळी माझ्याकडे विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी होती. परंतु आता आम्ही सर्व एकत्र आहोत. महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरता आम्ही तिघं एकत्र आलो आहोत.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “पुणे हे भारतातील उत्तम शहर आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही पुणे शहराला सर्वोत्तम करून दाखवू.

पुण्याची ओळख विद्येची नगरी म्हणून आहे. त्याचबरोबर येत्या काळात पुण्याची ओळख औद्योगिक नगरी म्हणून देखील होईल. कारण पुणे आमची औद्योगिक नगरी आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी सेक्टर आहे.

We will give a new airport to Pune in the near future – Devendra Fadnavis

“येत्या काळामध्ये आम्ही पुण्याला नवीन एअरपोर्ट देणार आहोत. पुण्यामध्ये आज मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन पुण्यातील ट्रॅफिकची समस्या कमी होणार आहे.

त्याचबरोबर पुण्यामध्ये गेल्या काही काळापासून अनेक इलेक्ट्रिक बस धावत आहे. प्रदूषण मुक्त भारत करण्याचं नरेंद्र मोदींचं स्वप्न पुणे शहरामध्ये साकार होताना दिसत आहे”, असही ते (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis | पुणे: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींना लोकमान्य …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now