Narendra Modi | पुणे: आज पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. लोकमान्य टिळक पुरस्कारासह मिळालेली रक्कम गंगेला समर्पित करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, “पुण्यासारख्या पवित्र ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच आहे. लोकमान्य टिळक हे आपल्या कपाळावरचे टिळक आहे.
त्यामुळे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.
लोकमान्य टिळक यांच्या नावात गंगाधर आहे. ज्यांच्या नावात गंगा आहे, त्यांच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम मी गंगेला समर्पित करणार आहे. या पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगे परियोजनेसाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे.”
When we receive any award, our responsibility increases – Narendra Modi
पुढे बोलताना ते (Narendra Modi) म्हणाले, “जेव्हा आपल्याला कोणताही पुरस्कार मिळतो, तेव्हा आपली जबाबदारी वाढते. या पुरस्कारामध्ये लोकमान्य टिळकांचं नाव जोडलेलं आहे.
त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर माझी जबाबदारी दुपटीने वाढली आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी सर्व देशवासीयांच्या चरणी समर्पित करतो. त्याचबरोबर मी देशातील जनतेला विश्वास देतो की त्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही.”
“लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका आपल्याला शब्दात मांडता येणार नाही. लोकमान्य टिळकानंतर भारतामध्ये जेवढे क्रांतिकारी नेते, स्वातंत्र्यसैनिक घडले, त्या प्रत्येकावर टिळकांची छाप होती.
जेव्हा इंग्रज म्हणायचे की भारतीय जनता देश चालवण्याच्या लायकीची नाही, तेव्हा टिळकांनी त्यांना खडसावून सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे.
भारतीय प्रथा, परंपरा, संस्कृती मागास असल्याचं इंग्रज म्हणायचे. मात्र, टिळकांनी हे सर्व चुकीचं सिद्ध करून दाखवलं आहे”, असही ते (Narendra Modi) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “मोदी बुलंद भारताचं स्वप्न प्रत्यक्षात…” मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक
- Narendra Modi | पुण्यात मोदींचं काय काम? मोदींच्या आगमनानंतर विरोधक आक्रमक
- Raj Thackeray | “टिळकांचे आणि गांधीजींचे वैचारिक मतभेद होते, मात्र…”; राज ठाकरेंचा मोदी-पवारांना टोला
- Opposition Leader | अखेर विरोधी पक्षनेता ठरला! ‘या’ नेत्याला मिळाली जबाबदारी
- Chitra Wagh | नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळतोय याचं ठाकरे गटाला पोटशूळ आलंय – चित्रा वाघ