Share

Eknath Shinde | “मोदी बुलंद भारताचं स्वप्न प्रत्यक्षात…” मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक

🕒 1 min read Eknath Shinde | पुणे: आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुण्यामध्ये हा पुरस्कार सोहळा सुरू आहे. कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | पुणे: आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुण्यामध्ये हा पुरस्कार सोहळा सुरू आहे. कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातच नव्हे तर प्रदेशात देखील मोठा सन्मान केला जातो.

सर्वत्र त्यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. इतकच नव्हे तर अरब आणि फ्रान्स या देशांनं  पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे. भारतीय म्हणून ही आपल्यासाठी खूप मोठी बाब आहे.

मोदींना कुणी बॉस म्हणतं, तर कुणी मोदींचा ऑटोग्राफ घेतं, त्याचबरोबर अनेक लोक त्यांच्या पाया पडतात. यु आर ग्लोबली पावरफुल, असं जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती मोदींना म्हणतात, तेव्हा प्रत्येक भारतीयाला मोदींचा अभिमान वाटतो.”

Narendra Modi has done the work of strengthening the country’s economy – Eknath Shinde

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “देशातील अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम मोदींनी केलं आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणलं आहे.

ब्रिटिशांची भारतातून हकलपट्टी करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी लढा दिला होता. त्याच ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागं टाकलं आहे.

नरेंद्र मोदी यांचं कर्तुत्व खूप मोठं आहे. त्यामुळं त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आलं, हे मी आमचं भाग्य समजतो.”

“मोदीजींनी देशाला आत्मनिर्भर भारत असा मंत्र दिला आहे. मोदींनी एकदा एखादी गोष्ट करण्याची ठरवली तर ते त्या मार्गानं जातातच. मग काश्मीर मधलं 370 कलम असू द्या, राम मंदिराचा विषय असू द्या किंवा वाराणसीचा कायापालट असू द्या.

गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अनेक विकास कामं मार्गी लागले आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल करणं, हे अंतिम ध्येय ठेवून मोदीजी वाटचाल करत आहे. त्यामुळं जगातील सर्व लोक मोदींकडे एक महत्त्वाचा नेता म्हणून बघतात”, असही ते (Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही