Sanjay Raut | नवी दिल्ली: लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यामध्ये येणार आहे.
लोकमान्य टिळक स्मारकराच्या वतीने पंतप्रधान मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकाच व्यासपीठावर येणार आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं योग्य नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
मोदींनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ती लोकं सध्या भाजपसोबत आहे. मोदींनी ज्या नेत्यांवर आरोप केले होते, ते सगळे नेते आज मोदींसोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. म्हणजे मोदींनी त्या नेत्यांवर केलेले आरोप खोटे आहे का?”
It is not right for Sharad Pawar to go to Modi’s event – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कुठेही जाऊ शकतात. ते मणिपूरसोडून सगळीकडे जातात. आजही ते मणिपूरला जाण्याऐवजी पुण्यामध्ये येत आहे.
मोदींनी कुठे जावं, हे आम्ही ठरवत नाही. त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्रमाबद्दल देखील आम्ही काही बोलत नाही. सध्या वाद आहे तो शरद पवारांवरून. मी तीन महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींना या कार्यक्रमाचा आमंत्रण दिलं होतं.
त्यामुळं मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही तर ते योग्य दिसणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळं शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं योग्य नाही.”
“नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर आरोप केले आहे. त्याचबरोबर त्यांचा पक्ष फोडला आहे. या देशात त्यांनी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला आहे.
हुकूमशाहीविरुद्ध लोकमान्य टिळकांनी मोठा लढा दिला आहे. त्या टिळकांच्या नावानं मोदींना आज पुरस्कार दिला जात आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधकांचा विरोध; दाखवणार काळे झेंडे
- Uddhav Thackeray | “मोदी कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते ते आज…”; ठाकरे गटाची मोदींवर खोचक टीका
- Sambhaji Bhide | साईबाबांची लायकी तपासा आणि मग पूजा करा – संभाजी भिडे
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची मिशी कापा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा; कुणी केली घोषणा?
- Chitra Wagh | “अडीच वर्ष घरकोंबडा बनून राहणारे…”; चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका