Chitra Wagh | मुंबई: मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार घडत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. देशाच्या राष्ट्रपती स्वतः महिला असून मणिपूरच्या घटनेबाबत त्यांची संवेदनशीलता नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Uddhav Thackeray has no reputation of his own – Chitra Wagh
उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहे, हे उद्धव ठाकरे यांना बघवत नाही.
उद्धव ठाकरे यांना स्वतःची काहीच प्रतिष्ठा उरली नाही, त्यामुळे ते दुसऱ्यांची प्रतिष्ठा कमी करताना दिसत आहे. हा सर्व प्रकार किती लाजिरवाणा आहे.”
पुढे बोलताना त्या (Chitra Wagh) म्हणाल्या, “स्वतःच सरकार असताना उद्धव ठाकरे अडीच वर्ष घर कोंबडा बनून राहिले होते. त्यामुळे राष्ट्रपतीवर टीका करण्याची सोडा पण बोलण्याची देखील तुमची लायकी नाही.
मणिपूरमध्ये घडत असलेल्या घटना अतिशय गंभीर आहे. मात्र, त्यातही तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहात. त्यासाठीच तुमचं हे सर्व चाललं आहे. राजकारणात तुम्ही किती खालचा दर्जा गाठला आहे, यावरून हे स्पष्ट दिसत आहे.”
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नाही तर एक मुस्लिम जमीनदार असल्याचं विधान संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. संभाजी भिडे यांच्या माध्यमातून भाजपला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मनू आजही जिवंत…”
- Varsha Gaikwad | मोदींसोबत एका व्यासपीठावर जाण्यापूर्वी पवारांनी एकदा विचार करावा – वर्षा गायकवाड
- Bacchu Kadu | “हे एखाद्या मुस्लिमानं म्हटलं असतं तर…”; संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
- Yashomati Thakur | “काँग्रेस कशासाठी…”; यशोमती ठाकूर यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- Chhagan Bhujbal | संभाजी भिडे यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करा – छगन भुजबळ