Yashomati Thakur | “काँग्रेस कशासाठी…”; यशोमती ठाकूर यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कैलास सूर्यवंशी या नावाने असलेल्या ट्विटर हँडलवरून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.

यानंतर यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. काँग्रेसने जगाला एक नवा भारत दिला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Congress gave the world a new India – Yashomati Thakur

ट्विट करत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, “काँग्रेस कशासाठी …. काँग्रेसने जगाला एक नवा भारत दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कट्टरतावाद आणि धर्म स्वीकारलेला पाकिस्तान कुठे राहिला, हे आपण सर्वांनी पाहिलं.

आज भारत जगातील एक प्रबळ देश म्हणून पाहिला जातो. दुसरीकडे, भारताच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला बांगलादेश आज एक प्रगतीशील अर्थव्यवस्था म्हणून वाढत आहे.

भारतीय उपखंडातील सर्व देशांमध्ये विकास व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून भारताने कायमच पुढाकार घेतला. त्याचे परिणाम आपल्याला दिसतायत.

स्वातंत्र्यसैनिकांनी अतिशय मेहनत करून या देशाला प्रगतीच्या मार्गावर आणलं. या देशाची उज्वल परंपरा आणि अपेक्षा यांची सांगड घातली.

सगळ्यांना अन्न-वस्त्र-निवारा मिळाला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीकोन मिळाला पाहिजे, चांगलं राहणीमान मिळालं पाहिजे यासाठी नव्या भारताची पायाभरणी केली गेली.

आज आपण जो भारत पाहतोय त्या भारताला काँग्रेसने स्वप्ने दिली. ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींनी केलं, मात्र भारत या शक्तींसमोर हरणार नाही.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही यांच्या रक्षणासाठी काँग्रेस रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढेल. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था तर आपण बनणारच आहोत, पण आमचं स्वप्न आहे जगातील सगळ्यांत जास्त दरडोई उत्पन्न भारताचं असावं.

इथल्या सगळ्या नागरिकांच्या हाताला काम असावं. जगातील सर्व प्रगत तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा, शिक्षण भारतात निर्माण व्हाव्यात, भारतातील सामान्य लोकांचं जीवनमान उंचवावं.

या देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात. कोणीही मागे राहू नये. उच्च-नीच भाव संपावा.

या देशात दंगे-धोपे होऊ नयेत, द्वेषापोटी हिंसा होऊ नये, कुणाच्याही धार्मिक अधिकारांमध्ये कुणाचीही ढवळाढवळ असू नये, सगळ्यांना उपासनेचा अधिकार असावा, राज्यघटनेचं योग्य रितीने पालन व्हाव… या देशासाठी काँग्रेसचं हे व्हिजन आहे.

केवळ पायाभूत सुविधांचा विकास नाही तर या देशातील सर्व भागांचा मानवीय विकास व्हायला पाहिजे हे आमचं धोरण आहे. मला वाटतं या देशातील सर्व तरूणांनी द्वेषाच्या राजकारणापासून या देशाला मुक्त होण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट केले पाहिजेत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.