Share

Yashomati Thakur | काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे-मारण्याची धमकी

Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. Sambhaji Bhide … Read more

Published On: 

Yashomati Thakur | टीम महाराष्ट्र देशा: मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे.

Sambhaji Bhide should be arrested – Yashomati Thakur

संभाजी भिडे यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक व्हावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांना जिवे-मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

कॉँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कैलास सूर्यवंशी या नावाने असलेल्या ट्विटर हँडलवरून त्यांना धमकी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर अमरावती पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ट्विटवर जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “नरेंद्र दाभोळकर अशाच प्रकारे ओरडत होता.

त्यामुळे त्याला आम्ही टराटरा फाडून जन्नतमध्ये पोहोचवला. तुमची देखील अशीच परिस्थिती होऊ शकते. धारकरी कोथळा बाहेर काढून टाकतील”, या शब्दात ट्विट करत ठाकूर यांना धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. देशाचा तिरंगी ध्वज तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजी याला तात्काळ देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक व्हावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने (Yashomati Thakur) केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही