अमरावती, 9 ऑक्टोबर: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेतील अनियमितता आणि ‘मतदार चोरी’च्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी संपूर्ण देशात गोंधळ निर्माण केल्याचा आरोप करत, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीने अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
गर्ल्स हायस्कूल चौकातून दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ॲड. यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहराध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले आणि मिलिंद चिमोटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी यावेळी ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचे हक्क वाचवा’ अशा घोषणा देत निवडणूक आयोग आणि सरकारचा तीव्र निषेध केला.
यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर यांनी दावा केला की, हा मोर्चा प्रामुख्याने एसआयआर प्रक्रिया आणि ‘मतदार चोरी’च्या मुद्द्यावर आधारित आहे. भाजपने एक ॲप विकसित केले असून त्याचा ॲक्सेस तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मतदार यादीतून कुणाची नावे वगळायची, हे याच ॲपच्या माध्यमातून ठरवले जात असल्याचे त्या म्हणाल्या. आपण माजी मंत्री आणि आमदार असूनही आपल्या मुलांच्या मतदार ओळखपत्रात चुका आढळल्याचे सांगत, सामान्य माणसांची काय स्थिती असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. इंडिया आघाडीने यावेळी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत, लोकशाहीत निषेध नोंदवण्याच्या अधिकारात अडथळा आणला जाऊ नये अशी मागणी केली.
कार्यालयाच्या दालनात इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सुपूर्द केले. या निवेदनात एसआयआर प्रक्रियेतील मतदार वगळण्याच्या प्रकाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पात्र मतदारांची तातडीने फेरनोंदणी करावी, आक्षेप नोंदवण्यासाठी पुरेशी संधी द्यावी आणि मतदार यादीतील बदलांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि घटनात्मक स्वायत्तता असावी, तसेच सरकारने या अनियमिततेची गंभीर दखल घेत मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, असेही नमूद करण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मिळणाऱ्या वागणुकीचा इंडिया आघाडीने निषेध केला असून, राहुल आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वीच निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठवल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर दाखल करा; रोहित पवारांचे पुणे पोलिसांना थेट आव्हान
- ‘आपण एकत्र यायचं का?’ सुप्रिया सुळेंच्या घरी पार्थ पवारांना विचारल्याचा युगेंद्र पवारांचा गौप्यस्फोट
- केसांमधील कोंड्यापासून मुक्ती हवीय? त्वचाविकारतज्ज्ञांनी दिला योग्य शॅम्पू आणि स्वच्छतेचा सल्ला
Quick Answers
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेतील अनियमितता आणि ‘मतदार चोरी’च्या मुद्द्यावरून, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
भाजपने एक ॲप विकसित केले असून त्याचा ॲक्सेस तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे, तसेच मतदार यादीतून कुणाची नावे वगळायची हे याच ॲपद्वारे ठरवले जात असल्याचा आरोप ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला.
एसआयआर प्रक्रियेतील मतदार वगळण्याच्या प्रकाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, पात्र मतदारांची तातडीने फेरनोंदणी करावी, आक्षेप नोंदवण्यासाठी पुरेशी संधी द्यावी आणि मतदार यादीतील बदलांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
हा मोर्चा ॲड. यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहराध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले आणि मिलिंद चिमोटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









