Narendra Modi | पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (01 ऑगस्ट) रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.
त्याचबरोबर मोदींच्या या दौऱ्यावर अनेक विकास कामांचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे. मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण तापलेलं दिसून आलं आहे.
Youth Congress has opposed Narendra Modi’s visit to Pune
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात युवक काँग्रेसकडून जागोजागी पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून युवक काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पुणे दौऱ्याला विरोध दर्शवला आहे.
मोदीजींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून पुण्यात ‘मन की बात बंद करो मनिपुर की बात करो’, ‘देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या का?’, ‘गो बॅक क्राईम मिनिस्टर’ अशा मजकुराचे बॅनर लावण्यात आले आहे.
या बॅनर्सनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर असणार आहे. ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर येत आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास मोदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ashok Saraf | बाईपण भारी, मात्र पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार? – अशोक सराफ
- Dhananjay Munde | बोगस खतं-बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द – धनंजय मुंडे
- Nana Patole | संभाजी भिडेंच्या माध्यमातून भाजपला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? नाना पटोलेंचा खडा सवाल
- Chandrashekhar Bawankule | “नाना पटोलेंनी अभ्यास करून…”; संभाजी भिडे प्रकरणावर बावनकुळेंची प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray | “पक्ष सोडून गेलेल्या लोकांकडून एकच अपेक्षा…”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल