Chandrashekhar Bawankule | “नाना पटोलेंनी अभ्यास करून…”; संभाजी भिडे प्रकरणावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule | परभणी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

त्यानंतर भिडेंविरोधात अमरावतीमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. अशात या प्रकरणावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

It is not right to associate Sambhaji Bhide with BJP – Chandrashekhar Bawankule

प्रसार माध्यमांची बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “संभाजी भिडे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे.

भिडेंचा भाजपशी संबंध जोडणे योग्य नाही. संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानाची सरकार योग्य ती चौकशी करेल. ज्यांनी कुणी वादग्रस्त टिप्पणी केली असेल, सरकार त्याच्यावर नक्की कारवाई करेल.”

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अमरावती येथे आंदोलन करण्यात आलं आहे.

या आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर देखील सहभागी झाल्या आहे. यावर प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “यशोमती ठाकूर यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही.

मात्र कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये असं मला वाटतं. खरंच जर कुणी वादग्रस्त टिप्पणी केली असेल तर सरकार त्यावर नक्की कारवाई करेल.”

दरम्यान, महात्मा गांधी यांच्याबद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, “मोहनदास गांधी म्हणजेच महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र आहे.

गांधीजींचे वडील म्हणजेच करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. एक दिवस करमचंद गांधी त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम चोरून पळून गेले.

त्यानंतर चिडलेल्या जमीनदाराने त्यांच्या पत्नीला आपल्या घरी आणून त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.