Ashish Shelar | ठाकरे गटानं सरळ-सरळ पाकिस्तानला मदत केली? आशिष शेलारांचा खडा सवाल

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले होते.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटावर पुन्हा एकदा  निशाणा साधला आहे. भारतातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे गटानं या प्रकल्पाला विरोध करून सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली का? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Pakistan is trying to get the refinery project – Ashish Shelar

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.

या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे.

म्हणजे..?

■■ गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले?

■■ प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या?

■■ देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती?

■■ उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली ?

दरम्यान, उद्धव ठाकरे गटानं रिफायनरी प्रकल्पासाठी विरोध दर्शवला (Ashish Shelar) होता. “रिफायनरीसाठी लोकांची डोक फोडण्याची योजना आखली जात आहे.

एअर बस आणि वेदांता हे प्रकल्प महाराष्ट्रात घेऊन या. मात्र रिफायनरीसारखे प्रकल्प महाराष्ट्रात चालणार नाही”, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.