Radhakrishna Vikhe Patil | नाशिक: राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काल (29 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली.
विधिमंडळाच्या दालनामध्ये दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar has no other option but to accept the leadership of Ajit Pawar – Radhakrishna Vikhe Patil
अजित पवार आणि रोहित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देत असताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.
रोहित पवारांना अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीमध्ये (Radhakrishna Vikhe Patil) काय चर्चा झाली याबद्दल रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना काढण्यासाठी मी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत आहे. उद्योगमंत्री महोदयांकडं वारंवार पत्रव्यवहार केला. तसंच मागील सलग दोन अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.”
माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना काढण्यासाठी मी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत आहे. उद्योगमंत्री महोदयांकडं वारंवार पत्रव्यवहार केला. तसंच मागील सलग दोन अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी अधिवेशनाचा कार्यकाल संपेपर्यंत अधिसूचना काढण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय… pic.twitter.com/JQ2QbdJ2by
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 28, 2023
“त्यावेळी अधिवेशनाचा कार्यकाल संपेपर्यंत अधिसूचना काढण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनी सभागृहात दिलं, परंतु अद्यापही त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निर्णय घेतलेला नाही.
याप्रश्नी आपण व्यक्तीशः लक्ष घालून अधिसूचना काढण्याबाबतच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित दादा यांना केली. यावेळी मतदारसंघातील इतर विषयांवरही चर्चा झाली”, असही ते या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sunil Tatkare | “पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले हे बहुतेक ज्योतिषी…”; काँग्रेस नेत्यांवर सुनील तटकरेंची टीका
- Dhananjay Munde | शरद पवारांची साथ का सोडली? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
- Sharad Pawar | एकमेकांची साथ सोडू नका, आपल्याला भाजपविरुद्ध लढायचं – शरद पवार
- Prithviraj Chavan | समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झाली पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण
- Sambhaji Bhide | “मानसिकदृष्ट्या ठीक नसलेल्या व्यक्तीचा वेळेत बंदोबस्त केला नाही तर…”; काँग्रेसची संभाजी भिडेंवर खोचक टीका