Prithviraj Chavan | समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झाली पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan | मुंबई: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून, एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. तर या प्रकरणावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण चांगलेच आक्रमक झाले आहे.

आज सभागृहात बोलताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी मोठं वादग्रस्त विधान केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भिडेंना अटक केली पाहिजे.

भिडे गेल्या अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल एवढं मोठं विधान केल्यानंतर भिडे बाहेर कसे फिरू शकतात? त्यांच्या या वक्तव्यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार?”

विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या मागणीची दखल घेतली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद करून सरकारने उचित कारवाई करण्याचे निर्देश देखील जारी केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहे.

Karamchand Gandhi is not the real father of Mahatma Gandhiji – Sambhaji Bhide

दरम्यान, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नाही.

तर महात्मा गांधी एका मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहे. करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्यावेळी करमचंद गांधी जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले होते.

त्यानंतर चिडलेल्या जमीनदाराने करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नीला म्हणजेच गांधीजींच्या आईला पळून त्याच्या घरी आणले होते. त्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.