Sanjay Raut | मुंबई: भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात राहुल कुल यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. या प्रकरणी राहुल कुल यांना राज्य सरकारनं क्लीन चीट दिली आहे.
अद्याप 2022-23 लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झालेला नाही. मात्र, 2021-22 लेखा परीक्षण अहवालामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्यास (Sanjay Raut) राज्य सरकारनं म्हटलं आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये कोणताही घोटाळा झाला नाही, असं देखील सांगण्यात आलं आहे. विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारनं हे उत्तर दिलं आहे.
Sanjay Raut accused Rahul Kul of corruption
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहीत राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असं राऊतांनी या पत्रात म्हटलं होतं. या भ्रष्टाचाराच्या आरोपातून राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाली आहे.
तर आर्थिक वर्षाच्या अहवालाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार समोर आला तर त्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Rohit Pawar | “राष्ट्रवादीचं चिन्ह आमच्याकडं राहिलं नाही तर…”; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
- Eknath Shinde | शिंदे गटातील आमदाराची झाली तब्बल साडेसात कोटींची फसवणूक, नक्की काय आहे प्रकरण?
- Sambhaji Bhide | करमचंद गांधी पैसे घेऊन पळाले अन् जमीनदाराने त्यांची बायको पळवून नेली, महात्मा गांधीचे वडील मुस्लिम – संभाजी भिडे
- Vijay Wadettiwar | खोटं बोलायला एवढा कॉन्फिडन्स लागतो; विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल