Eknath Shinde | आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde | मुंबई: आज (28 जुलै) राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसऱ्या आठवड्याचा पाचवा दिवस आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात बोलत असताना सरकारच्या विविध कामांची माहिती दिली.

त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

This is the farmers’ government – Eknath Shinde

सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “सध्याचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्याचबरोबर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. विरोधक आमच्यावर सतत टीका करत असतात.

आम्ही त्यांच्या टीकेला आमच्या कामातून उत्तर देतो. माझं सरकार, माझी जबाबदारी एवढीच आमची जबाबदारी नाही. आमच्या कामांचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणून काही जणांची पोटदुखी वाढत चालली आहे.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “इर्शाळवाडीत आम्ही दिखाव्यासाठी गेलो नव्हतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत.

म्हणून रस्ते तुडवत आम्ही घटनास्थळी पोहोचतो. त्याचबरोबर आम्ही वर्क फ्रॉम होम देखील करत नाही. या सरकारनं जे काही निर्णय घेतले आहे ते जनतेच्या भल्यासाठीच घेतले आहे.”

“महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची काही काम स्थगित करण्यात आली होती. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लगेच ती काम पुन्हा नव्याने सुरू केली आहे.

आमचं सरकार फक्त तोंडाची वाफ दडवत बसत नाही”, असही ते (Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.