Sambhaji Bhide | करमचंद गांधी पैसे घेऊन पळाले अन् जमीनदाराने त्यांची बायको पळवून नेली, महात्मा गांधीचे वडील मुस्लिम – संभाजी भिडे

Sambhaji Bhide | अमरावती: राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. मात्र, हे त्यांचं खरं नाव नसल्याचा दावा संभाजी भिडे यांनी केला आहे.

करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mahatma Gandhi is the son of Karamchand Gandhi’s fourth wife – Sambhaji Bhide

अमरावतीमध्ये बोलत असताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, “मोहनदास म्हणजेच महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र आहे.

करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले.

पुढे बोलताना ते (Sambhaji Bhide) म्हणाले, “त्यानंतर जमीनदारांने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नसून ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहे.

त्यानंतर महात्मा गांधीजींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील आहे.”

यावेळी बोलत असताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी हिंदुत्वावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “जगाच्या पाठीवर हिंदुस्तान एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे.

हिंदूंची कीर्ती आणि शौर्य अफाट आहे. मात्र, सध्या हिंदू स्वतःच कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि धर्म विसरल्याचं दिसून आलं आहे. हिंदुस्थानाची आणि हिंदूंची अधोगती होत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.