Sanjay Shirsat | भविष्यात निश्चितच अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. राज्य सरकारमध्ये सामील होताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

त्यानंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील या चर्चा सुरू झाल्या आहे. या चर्चांवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

अशाच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार भविष्यात निश्चितच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde is the Chief Minister till 2024 – Sanjay Shirsat

माध्यमांची संवाद साधत असताना संजय शिरसाट म्हणाले, “भविष्यामध्ये अजित पवार निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. मात्र, 2024 पर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री आहेत. अजित पवार भविष्यात म्हणजे 05 ते 10 वर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी देखील मोठे वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले, “अजित पवार आज ना उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. कारण अजित पवार राज्याचे एक लोकप्रिय आणि वजनदार नेते आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते आमच्या पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे आज ना उद्या त्यांना संधी मिळेलच.”

प्रफुल पटेल यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली होती. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “अजित पवार 10 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसरी सन्मानजनक जबाबदारी देऊन पवारांना मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय भाजपनं घेतलेला दिसतोय.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.