Jitendra Awhad | “… नाहीतर जनमाणसाचा उद्रेक होऊ शकतो”; जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Jitendra Awhad | मुंबई: सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत बोलत असताना राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

जेव्हा महामानवांबद्दल लिहिलं जात, तेव्हा सायबर सेलला आरोपी कधीच सापडत नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “सावित्री माई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या अनेक महामानवांबद्दल अनेक वेब साईट्स वरुन अनेकदा आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करण्यात आलाय.

इतर वेळी जेंव्हा सत्ताधारी गटातील राजकीय नेत्याबद्दल आक्षेपार्ह बोलल जात, तेंव्हा संबंधित आरोपीस अटक करण्यात सायबर सेल ला काहीच वेळ लागत नाही.परंतु जेंव्हा महामानवांच्या बद्दल लिहिलं जात, तेंव्हा मात्र सायबर सेल ला आरोपी कधीच सापडत नाहीत..!”

“याकडे वेळीच लक्ष दिले नाहीं तर जनमानसाचा उद्रेक होऊ शकतो. माझी इतकीच विनंती आहे की,सावित्री माई फुलेंची बदनामी करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र पोलीस कधी अटक करणार,याच उत्तर संबंधित मंत्र्यांनी सभागृहाला द्यावे”, असही ते (Jitendra Awhad) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

It is not appropriate to end the session in the middle – Nana Patole

दरम्यान, पावसाचं कारण काढून राज्य सरकार पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत असल्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसले आहे.

“अधिवेशनाचा कार्यक्रम 04 ऑगस्टपर्यंत ठरलेला आहे. त्यामुळं पावसाचं कारण काढून मधेच अधिवेशन संपवणं योग्य नाही”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.