Share

Nitesh Rane | जागतिक ‘गद्दार’ दिवसाच्या शुभेच्छा; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीचा दिवस ठाकरे गटाकडून ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याचबरोबर हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून घोषित करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक टीका … Read more

Published On: 

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीचा दिवस ठाकरे गटाकडून ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला होता.

त्याचबरोबर हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून घोषित करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती.

याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक टीका केली आहे. नितेश राणेंनी आज जागतिक गद्दार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

Today is Uddhav Thackeray’s birthday

आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अशात नितेश राणेंचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. “जागतिक ‘गद्दार’ दिवसाच्या शुभेच्छा” असं नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे. नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना हा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या या ट्विटनंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा नाव वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. नितेश राणे यांच्या या ट्विटवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल?

याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणेंसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं.

अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे.

कारण 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे नरेंद्र मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही