Uddhav Thackeray | “… म्हणून शिंदे गटाची माझ्याकडे यायची हिम्मत झाली नाही”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: आज (27 जुलै) उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टला मुलाखत दिली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

शिवसेना फोडल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांची माझ्याकडे यायची हिंमत झाली नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटाचे नेते शरद पवारांचा (Sharad Pawar) आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते.

शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांची माझ्याकडे यायची हिम्मत झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळून आम्ही बाहेर पडलो असे ते सांगतात.

मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या म्हणजेच अजित पवारांच्या (Ajit Pawar) हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. बाळासाहेबांचे विचार चोरले वगैरे हे सगळं ढोंग होतं.”

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “2014 ते 2019 या कालावधीमध्ये सत्ता होती, तेव्हा भाजपसोबत कसं बसायचं? असं हे महाशय म्हणायचे, तेव्हा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता.

आता तिकडे गेलेले मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतोय असं सांगतात. पण त्यांना खिशात राजीनामे घेऊन फिरायचं कुणी सांगितलं? किंबहुना त्यांच्यावर ही वेळ का आली?”

Shinde group knows my nature very well – Uddhav Thackeray

“शिवसेना फुटल्यानंतर कुणाची माझ्या दारात परत यायची हिंमत झाली नाही. कारण त्यांना माझा स्वभाव चांगलाच माहीत आहे. मी जशास तसे उत्तर देणारा व्यक्ती आहे.

त्याचबरोबर मी आरे ला कारे करणार आहे. म्हणून आत्तापर्यंत मी लढलो आहे”, असही ते (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.