Kirit Somaiya | मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या व्हिडिओवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. या व्हिडिओची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती.
त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या व्हायरल व्हिडिओवरून विधिमंडळात देखील मोठा गदारोळ झाला होता.
या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली होती. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर महिला शोषणाचा आरोपही केला होता.
It has been reported that the video of Kirit Somayya is real
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
या चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेतील सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची जाहीर घोषणा झालेली नाही.
दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसले होते.
अशात हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ जर खरंच खरा असेल तर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- Deepak Kesarkar | उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भाषा शोभत नाही – दीपक केसरकर
- Uddhav Thackeray | सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोलाचा सल्ला
- Raj Thackeray | “आजही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र…”; राज ठाकरेंचं मोठं विधान
- Chitra Wagh | “सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत…”; चित्रा वाघांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले
- Chandrashekhar Bawankule | “मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका