Deepak Kesarkar | मुंबई: ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुलाखत दिली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.
ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना खेकड्याची उपमा दिली आहे. याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांची भाषा शोभत नाही. आम्ही त्यांच्याशी आदराने बोलतो.
त्यामुळं त्यांनीही आमच्याशी आदरानेच बोलावं. कारण ऐकताना प्रत्येक जण संयम पाळतो असं नाही, कुणी त्यांना चुकीचं उत्तर दिलं तर त्यांच्या मनाला ते लागेल.”
Uddhav Thackeray is expected to speak calmly – Deepak Kesarkar
पुढे बोलताना ते (Deepak Kesarkar) म्हणाले, “उद्धव ठाकरेंकडून संयमानं बोलण्याची अपेक्षा असते. परंतु मुलाखतीमध्ये ठाकरेंनी संजय राऊत यांच्यासारखी भाषा वापरली आहे.
ती भाषा त्यांना अजिबात शोभत नाही. उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. वाढदिवसादिवशी उद्धव ठाकरेंनी चांगलं बोलावं.”
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राज्यासह देशाला मार्गदर्शन केला आहे. परंतु बाळासाहेबांच्या मार्गापासून उद्धव ठाकरे वेगळे झाल्याचं दिसत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आता त्यांना पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही”, असही ते (Deepak Kesarkar) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | “आजही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र…”; राज ठाकरेंचं मोठं विधान
- Uddhav Thackeray | सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना मोलाचा सल्ला
- Raj Thackeray | भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
- Chandrashekhar Bawankule | “मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत…”; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Sanjay Raut | दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार आहे का? संजय राऊतांची सरकारवर खोचक टीका