Raj Thackeray | भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

Raj Thackeray | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे, तेव्हापासून कोण कुणासोबत युती करेल हे सांगणं अशक्य झालं आहे.

अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत युती करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आज राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.

If someone meets someone, it does not mean that there is an alliance – Raj Thackeray 

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “कुणी कुणाला भेटलं म्हणजे युती होत नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गेलो होतो.

त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार देखील उपस्थित होते. म्हणजे लगेच आमची युती झाली का? आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही.”

अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी समृद्धी टोलनाक्यावर केलेल्या तोडफोडीवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “अमित ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.

ते या दौऱ्यादरम्यान टोलनाके फोडत चालले आहे, असं काही नाही. त्यांच्या गाडीला फास्टटॅग होता, तरीही त्यांना टोल नाक्यावर थांबवण्यात आलं.

मी टोल भरलेला आहे, असं सांगूनही फोनाफोनी सुरू झाली. समोरचा माणूस उद्धटपणे बोलल्यावर त्यांच्याकडून ती प्रतिक्रिया आली आहे.”

“निवडणुकीत टोलमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा भाजपनं केली होती. त्याचं काय झालं? याबद्दल त्यांनी बोलावं. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी फेन्सिंग नाही, त्यावर भाजपनं भाष्य करावं.

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. याची जबाबदारी राज्य सरकार किंवा भाजप घेणार का?”, असही ते (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.