Share

Ashish Shelar | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे अपचनाचे करपट ढेकर – आशिष शेलार

🕒 1 min read Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीवर आशिष शेलार … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीवर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत ही जळजळ मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेइमानी केली ते इमानदार कसे? असा सवाल आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

A struggle to get out of the “stigma” of not managing the government – Ashish Shelar

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे!

ही कसली मुलाखत…ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर. स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या “कलंका”तून बाहेर पडण्याची धडपड!!”

“भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे काडतुस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!!” असही ते (Ashish Shelar) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही